Belagavi

टिळकवाडीतील साई मंदिरात रामनवमी

Share

सब का मलिक एक हैअसा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या बेळगावातील टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे गेटजवळील मंदिरात शनिवारपासून रामनवमीला भक्तिभावाने प्रारंभ झाला. रामनवमीनिमित्त आज रविवारीही विविध धार्मिक कार्यक्रम, मान्यवरांचा सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सर्व धर्म, जात, पंथ मानवाने निर्माण केले आहेत. पण आपण सगळे त्या एकाच ईश्वराची लेकरे आहोत असा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांचा जन्मही रामनवमी दिवशीच झाल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवसाला साईभक्तांच्या दृष्टीने विशेष महत्व आहे. पहिल्या रेल्वे गेटजवळील साई मंदिरात रामनवमीनिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. भूपाळीनंतर काकडआरती करण्यात आली. त्यानंतर पाळणा उत्सव होऊन राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. फ्लो

रामनवमीनिमित्त साई मंदिरात पालखी सोहळा, विशेष आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. दुपारी व सायंकाळीही विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.

Tags: