Banglore

मुतालिक यांची मोहीम-सरकारचा काही संबंध नाही : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली आज बसवकल्याण विकास मंडळाची सातवी बैठक पार पडली.

होय, बसवकल्याण येथील बसवकल्याण विकास मंडळाच्या कार्यालयात मंडळाची सातवी बैठक मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. फ्लो

बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, बसवकल्याण भागात चांगल्या पद्धतीने विकासकामे करण्यासंदर्भात आज मंडळाची विशेष बैठक घेतली आहे. बसवकल्याण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने आम्ही काम करत आहोत.

प्रमोद मुतालिक यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बोम्मई म्हणाले, कुठल्याही मोहिमेचा आणि सरकारचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही. सरकारपुढे सगळे समान आहेत. प्रत्येकजण आपापला धर्म, परंपरा पाळतो. सरकार म्हणून आम्ही केवळ कायद्यात काय आहे ते पाहतो.

बैठकीला माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा. केंद्रीय मंत्री भगवंत खुबा विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. जिल्हा पालकमंत्री शंकर पाटील-मुनेनकोप्प, पशु संगोपन मंत्री प्रभू चव्हाण, आ. ईश्वर खांड्रे, बंडेप्पा काशमपूर, राजशेखर पाटील, रहीम खान, शरणु सलगर, बसवकल्याण विकास मंडळाचे सदस्य, प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच सरकारी अधिकारी उपस्थित होते.

Tags: