कारच्या काचा फोडून साउंड सिस्टीम आणि अन्य साहित्य चोरून चोरटे फरारी झाल्याची घटना बेळगावातील महांतेश नगरात घडली आहे. एकाचवेळी अनेक कार्सच्या काचा फोडून अशारितीने चोरी करण्यात आल्याने या परिसरात खळबळ माजली आहे.

होय, शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी महांतेश नगरातील महंत भवन ते कनकदास चौक परिसरातील घरांसमोर उभ्या केलेल्या ६ कारच्या काचा फोडून टेप-साऊंड सिस्टिमसह अन्य सुटे भाग चोरून नेले. याबाबत कारमालकांनी माळमारुती पोलीस ठाणे गाठून चोरीची फिर्याद दिली. चोरीच्या या घटनांमुळे महांतेश नगर, अंजनेय नगर, अशोक नगर परिसरातील रहिवाशांत भीती पसरली असून या चोरट्याने तातडीने बेड्या ठोकाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Recent Comments