गांजासह अमली पदार्थांच्या विरोधात बेळगाव पोलिसांनी कारवाई पुढे सुरूच ठेवली आहे. गांजा विकणाऱ्या दोघा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

होय, बेळगावातील खंजर गल्लीतील पार्किंग स्थळ गांजा विक्रीचा अड्डा बनला आहे. या ठिकाणी गांजाची लपून छपून राजरोस विक्री होत असल्याची पक्की खबर मिळाल्यावरून मार्केट पोलिसांनी येथे छापा मारला. या छाप्यात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी खंजर गल्लीतील रहिवासी 23 वर्षीय युनूस अब्दुल खादर मकानदार आणि पंजीबाबा कॉलनीतील रहिवासी 24 वर्षीय रहिवासी सुलतान अहमद हमीद शहा याना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्यावर मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Recent Comments