बेळगावमधील युनियन जिमखान्यावर सुरु असलेल्या के आर शेट्टी टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या अर्जुन स्पोर्ट्स आणि के आर शेट्टी किंग्ज या संघात झालेल्या लढतीत अर्जुन स्पोर्ट्स संघाने ६ गडी राखून विजय मिळविला आहे.के आर शेट्टी किंग्ज स्पोर्ट्स संघाने १६ षटकात ४ गडी बाद करून ११६ धाव घेत विजय मिळविला. अर्जुन स्पोर्ट्स संघाच्या आनंद कोण्णूर या स्पर्धकाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. इम्पॅक्ट प्लेयर ऑफ दि मॅच म्हणून स्वप्नील एळवे, बेस्ट काच संतोष सुळगे पाटील, अधिकाधिक षटकार मारणाऱ्या स्वप्नील येळवे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रत्न भाटे, सादिक मुल्ला, महादेव एल ए, शेखर जाणवेकर, मानस नाईक आदी उपस्थित होते.



Recent Comments