कर्नाटकाच्या धार्मिक इतिहासात गच्चीनमठाला विशेष असे स्थान आणि महत्व आहे. अथणी म्हणजे अप्प मुरुगेन्द्र शिवयोगिनीचे प्रमुख स्थान. याचठिकाणी महान चैतन्य शक्ती शिवयोगी शताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

व्हॉइस: या बैठकीत गाचीनमठचे शिवबसव महास्वामींनी माहिती देताना सांगितले कि, अथणी शिवयोगी लिंगैक्य शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी शताब्दी सोहळा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, यानिमित्ताने १८ एप्रिल पासून बसव पुराण प्रारंभ होत असून गावागावात शिवयोगी ज्योतियात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महिनाभर सुरु असणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने महसूल समिती, स्वागत समिती, दासोह समिती यासह अनेक समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. शिवयोगीचा जीवन चरित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात येणार असून २५००० लोकांच्या घरात शिवयोगी वचन ग्रंथ पोहोचणार असल्याचे ते म्हणाले.
यानंतर विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी बोलताना म्हणाले, शताब्दी सोहळा आपल्या कार्यकाळात आला, हे मी माझे भाग्य समजतो. या निमित्ताने तालुक्यातील जनतेने या सोहळ्यास पाठिंबा देऊन सहकार्य करण्याची गरज असल्याचे सवदी म्हणाले. ()
यावेळी सीपीआय शंकरगौडा बसनगौडार, पी एस आय कुमार हडकर, डॉ. मल्लिकार्जुन हांजी, एस के बुटाळी, के ए वणजोळ, इराण्णा दड्डी, गजानन मंगसुळी, ए एम खोबरी, श्रीकांत पुजारी, भाऊसाहेब जाधव, प्रकाश महाजन, रावसाब ऐहोळे, मल्लिकार्जुन कनशेट्टी, आय जी बिरादार, शिवानंद गुड्डापूर, डेटा वास्टर आदी उपस्थित होते.


Recent Comments