महावीर जयंतीच्या निमित्ताने महावीर भवन येथे उत्सव सखीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महावीर जयंती निमित्त महावीर भवन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शनीवारी रांगोळी स्पर्धा, बिस्कीटपासून पाककृती बनविणे, कलश सजावट आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सायंकाळी संस्कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचप्रमाणे विविध गटांसाठी नृत्य स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव सखीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते मात्र यंदा उत्स्फूर्तपणे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
गेल्या सात वर्षांपासून सुरु असलेल्या या उत्सवात अनेक स्पर्धक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. मात्र गेल्या २ वर्षात कोरोनामुळे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाही. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येते. यंदा देखील हा कार्यक्रम उत्साहात साजरा होत असल्याचे कार्यक्रमाच्या महिला आयोजकांनी सांगितले.


Recent Comments