शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगावात आमदारांच्या घरांसमोर भाजीपाला, शेतमाल विकून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी यांनी दिली.

होय, शेतीमालाला हमीभाव द्यावा,राज्य सरकारने ३ वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावेत, बेळगावात सुरु केलेले खासगी जयकिशन भाजीमार्केट बंद करावे यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवारी बेळगावात पत्रकार परिषदेत याची माहिती देताना सिदगौडा मोदगी म्हणाले,
केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यभरात संयुक्त शेतकरी आंदोलन समितीतर्फे 11 ते 17 एप्रिलपर्यंत विश्वासघात सप्ताह पाळण्यात येणार आहे. मंगळवारी म्हैसूरमध्ये या सप्ताहाला चालना देण्यात येईल. बुधवारी सकाळी १० वाजता बेळगावात जिल्हा पंचायतजवळील आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे शेतीमाल विक्री आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शनिवारी सकाळी १० वाजता होसूर पिंपळकट्टा येथील आ. अभय पाटील यांच्या निवासस्थानासमोरही शेतमाल विकून आंदोलन करण्यात येणार आहे. १८ एप्रिलला बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमाल विक्री करून या आंदोलनाचा समारोप करण्यात येईल असे सांगून मोदगी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. बाईट
यावेळी शेतकरी नेते रवी पाटील, संतोष एच. एम., शिवलीला मिसाळे, जी. व्ही. कुलकर्णी आदी उपस्थित होते.


Recent Comments