चालकाचे नियंत्रण सुटल्याने लोखंडी रॉड्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या टिप्परला धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. हलगा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ शेजारील बायपासवर झालेल्या या अपघातात सुदैवानेच प्राणहानी झाली नाही.

होय, हलगा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ शेजारील सर्व्हिस रस्त्यावर बालाजी काँक्रेट समोर दोन वाहनांची टक्कर झाली. लोखंडाचे रॉड्स वाहून नेणाऱ्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याचा ट्रक समोरून येणाऱ्या खडिवाहू टिप्परला धडकला. त्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्याशिवाय चालक व क्लिनरला किरकोळ दुखापत झाली आहे. शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवानेच या अपघातात प्राणहानी झाली नाही. वाहतूक दक्षिण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.


Recent Comments