देशातील दरवाढीच्या निषेधार्थ विजापूर शहरातील सिद्धेश्वर देवस्थान नजीक युवा काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.

दिवसेंदिवस होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आज विजापूरमध्ये युवा काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. युवा काँग्रेस अध्यक्ष महम्मद नलपाड यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी हातगाडीवर पेट्रोल, गॅस सिलिंडर, डिझेल, स्वयंपाकाचे तेल ठेवून निषेध रॅलीच्या माध्यमातून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.यावेळी महम्मद नालपाड यांनी भाजप सरकारविरोधात संताप व्यक्त केला. २०१४ साली भाजप सरकार सत्तेवर आले. मात्र आतापर्यंत केवळ दरवाढ होत आली असून या दरवाढीवर कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. भाजप सरकार हे पीक पॉकेट सरकार असल्याची टीका त्यांनी केली.
या आंदोलनात युवा काँग्रेस प्रधान सचिव संयुक्ता पाटील, मोसीन शेख, काँग्रेस नेते अब्दुल हमीद मुश्रीफ, वकील सुरता आदींसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments