बेळगाव तालुक्यातील किणये गावात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मिरवणुकीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

किणये येथे येत्या २ मे रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर गावातील मध्यवर्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त अनगोळहुन किणयेपर्यंत या पुतळ्याची ट्रॅक्टरमधून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावात ही मिरवणूक येताच बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तिचे भव्य स्वागत केले. फ्लो
येत्या २ मे रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर किणये गावातील मध्यवर्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यासाठी मिरवणुकीने आणलेल्या शिवपुतळ्याचे स्वागत करून बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, बेळगाव ग्रामीण मतदार संघातील सर्व देवस्थानांचा विकास, पुतळा प्रतिष्ठापना आणि अन्य सर्व विकासकामांना मी प्राधान्य देत आहे. हे कार्य निरंतर सुरु ठेवण्यासाठी मतदारांनी मला सहकार्य, आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, किणये येथील नेते युवराज पाटील, मारुती डुकरे, महेश डुकरे, नामदेव डुकरे, संतोष पाटील, अनिल पाटील, रामनिंग दळवी, सातेरी यांच्यासह शिवप्रेमी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments