पाचवीत शिकणाऱ्या विजापूरमधील एका बालिकेला किडनी विकाराने ग्रासले आहे. किडनी विकारामुळे त्रस्त असलेल्या बालिकेवर उपचार करण्याची गरज असून आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कुटुंबियांकडून उपचार करणे शक्य नाही. यामुळे या मुलीच्या उपचारासाठी दानशूर व्यक्तींनीं पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील बसरकोड या गावातील हणमंत ज्योती या दाम्पत्याचे तिसरे अपत्य असणाऱ्या ११ वर्षीय पूजा नामक मुलीला किडनी विकाराने ग्रासले आहे. वयाच्या पाचव्या वर्षीपासून हा विचित्र आजार पूजाला जडला आहे. आपल्या मुलीच्या उपचारासाठी तिच्या वडिलांनी ८ ते १० लाख रुपये किमतीची १ एकर जमीन देखील विकली. पूजावर पुढील उपचारासाठी ३ लाख रुपयांच्या खर्चाची आवश्यकता असून उपचाराचा खर्च न परवडल्याने दानशूर व्यक्तींनी उपचाराला हातभार लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
पूजाचे वडील हे कुली काम करतात. तर आई टेलरिंगचे काम पाहते. तीन मुलींमधील पूजा हि सर्वात लहान मुलगी असून पूजाच्या उपचारासाठी कर्जाऊ रक्कम घेऊन तिच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु तिच्यावर उपचार करण्यासाठी हे प्रयत्न कमी पडत असून दानशूर व्यक्तींनी हातभार लावावा असे आवाहन करण्यात येत आहे ,
पूजाच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन तिचा जीव वाचविण्याची गरज आहे. पूजा आणि तिच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी इच्छुकांनी स्टेट बँक ऑफ इंडिया येथे हणमंत नागाप्पा बेनाळ यांच्या नवे असलेल्या AC NUM-10817761689 IFSC-सीबीं०००५३१५ या क्रमांकावर आपली मदत जमा करावी, अथवा अधिक माहितीसाठी 9972471301 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विजयकुमार सारवाड, आपली मराठी विजापूर.


Recent Comments