Belagavi

अनगोळ येथे मारुती मंदिराचा रथोत्सव भक्तिभावाने

Share

 बेळगावातील अनगोळ येथे प्राचीन मारुती मंदिराचा रथोत्सव आज, शुक्रवारी सकाळी भक्तिभावाने, उत्साहात पार पडला.

होय, अनगोळमधील पुरातन श्री मारुती मंदिराच्या नव्या रथाची मिरवणूक आज, शुक्रवारी उत्साह आणि जल्लोषात भक्तिभावाने काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात काढलेल्या या मिरवणुकीत भक्तांनी मोठ्या श्रद्धेने भाग घेतला. खासकरून युवकांची व महिलांची संख्या लक्षणीय होती. या मिरवणुकीत जलकुंभ घेऊन, पारंपरिक वेशभूषा परिधान करून अनेक सुवासिनी सहभागी झाल्या होत्या.  

अनगोळच्या पुरातन प्राचीन मंदिराचा जुना रथ जीर्ण झाल्याने नवीन रथाची निर्मिती करून रथ परंपरा पुढे चालविण्यात येत आहे. नवीन रथ २ वर्षांपूर्वीच निर्माण करण्यात आला आहे. मात्र कोरोना महामारीमुळे रथोत्सव मिरवणूक काढता आली नव्हती. त्यामुळे आज ही रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली आहे अशी माहिती मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘आपली मराठी’ला दिली.

या रथोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अनगोळमधील अन्य मंदिरात देवतांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला. दरम्यान, रथोत्सवानिमित्त येत्या रविवारी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

 

 

Tags: