Khanapur

लघु उद्योग भारतीच्या सदस्यांची अवरोळीला भेट

Share

 खानापूर तालुक्यातील अवरोळी येथील कम्मार कुटुंबियांच्या कुलुपे बनविण्याच्या पारंपरिक व्यवसाय केंद्राला लघु उद्योग भारतीचे सदस्य आणि उद्योजकांच्या पथकाने भेट देऊन माहिती घेतली.  

होय, सुमारे १०० वर्षांहून आधी काळची परंपरा लाभलेल्या आणि राज्यात व परराज्यांत प्रसिद्धी मिळवलेल्या अवरोळीतील कम्मार कुटुंबियांच्या लोखंडी कुलुपे बनविण्याच्या केंद्राला लघु उद्योग भारतीचे सदस्य आणि उद्योजकांच्या पथकाने भेट देऊन माहिती घेतली. यावेळी लघु उद्योग भारतीचे सचिव श्रीधर उप्पीन, कार्यकारी समिती सदस्य बसवराज रामपुरे, रा. स्व. संघाचे बेळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुरुदत्त कुलकर्णी, सेवा कार्ट फौंडेशनचे संचालक गोविंद केळकर आदींनी भेट देऊन पाहणी केली. या पथकाला कम्मार कुटूंबातील ज्येष्ठ सदस्य वीरभद्र कम्मार यांनी पारंपरिक कुलुपे बनविण्याच्या व्यवसायाची सविस्तर माहिती दिली. फ्लो

यावेळी पथकातील सदस्यांनी वीरभद्र कम्मार यांचा शाल घालून सत्कार केला.

 

Tags: