के आर रत्नाकर शेट्टी चषक २०२२ अंतर्गत युनियन जिमखान्यावर सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यात साईराज वॉरियर्स आणि साई स्पोर्ट्स मध्ये लढत झाली. या लढतीत साईराज वॉरियर्सने माजी मारली.

शुक्रवारी झालेल्या लढतीत साईराज स्पोर्ट्स संघाने १५० धावा केल्या यावर प्रत्त्युत्तरा दाखल खेळण्यात आलेल्या साईराज वॉरियर्स संघाने १५१ धावा घेत साईराज स्पोर्ट्सचा पराभव केला. साईराज स्पोर्ट्स संघातील गोविंद गावडे, यश कळसनवर, सुशांत कोवाडकर, रोहित पोरवाल, कृष्णा बगाडी, दीपक राक्षे, नरेंद्र मानगुरे, ओंकार वेर्णेकर त्यानंतर साईराज वॉरियर्स संघातील सुजय सातेरी, ओंकार वेर्णेकर, अभिषेक देसाई, सुदानवा कुलकर्णी, पार्थ पाटील, राज डांगणावर आदी खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली.
यानंतर विश्रुत स्ट्राईकर्स आणि बीसीसी मच्छे या संघात झालेल्या लढतीत विश्रुत स्ट्राईकर्सने बाजी मारली. विश्रुत स्ट्राईकर्स संघाने १५३ धावा घेत बी सी सी मच्छे संघाचा पराभव केला.या स्पर्धेत उत्तम झेल साठी विजय पाटील, अधिकाधिक षटकारासाठी विशाल गौरगोंडा,, प्रभावशाली खेळाडू मनोज पाटील, सामनावीर सुदीप सातेरी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


Recent Comments