बेळगाव जिल्ह्यातील अनेक शाळांची दुरवस्था झाली असून दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अनेक सरकारी शाळा मोडकळीस आलेल्या दयनीय अवस्थेत आहेत. त्यामुळे विध्यार्थ्यांना धोका निर्माण झाला असून, दिल्लीतील सरकारी शाळांच्या धर्तीवर त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे सदस्य विजय पाटील यांनी केली. गुरुवारी बेळगावात दिल्लीतील सरकारी शाळांचा विकास कसा झाला याबाबत व्हीडिओ चित्रफीत मुलांना दाखवण्यात आली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपचे पदाधिकारी विजय पाटील म्हणाले, राज्यातील सरकारी शाळांत अनेक ठिकाणांहून विध्यार्थी शिकण्यासाठी येतात. त्यांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्याची गरज आहे. कर्नाटकात २ लाख कोटी रुपये खर्च करून शाळांचा विकास करावा अशी मागणी त्यांनी केली.
एकंदर, सरकारी शाळांचा विकास करून विध्यार्थ्यांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.


Recent Comments