बेळगाव विभागातील सात जिल्ह्यातील तंत्रशिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता, आणि रोजगार विषयक कार्यशाळेचे व्हीटीयू प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे.

यासंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी पत्रकार परिषद बोलाविली होती. या परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, बेळगाव विभागातील सात जिल्ह्यातील तंत्रशिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता, आणि रोजगार विषयक कार्यशाळेचे व्हीटीयू प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. मास मीडिया आणि उद्योग विभागाच्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अभियांत्रिकी, डिप्लोमा आणि आयटीआय विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शुक्रवार दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता बेळगाव येथील व्हीटीयू प्रांगणात ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत औद्योगिक मंत्री मुरुगेश निराणी यांची उपस्थिती असणार असून पालकमंत्री गोविंद कारजोळ, उमेश कत्ती, शशिकला जोल्ले यांचाही सहभाग असेल. संसाधन व्यक्तींचे व्याख्यान आणि मार्गदर्शन या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना कार्यशाळेनंतर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन प्रकल्पांचा शोध पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मुरुगेश निराणी यांच्या उपस्थितीत औद्योगिक अदालत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचप्रमाणे उद्योजकांशीही मुरुगेश निराणी संवाद साधणार असून यावेळी व्यापारी स्थानिक स्थानिक पातळीवरील समस्या मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊ शकतात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले.


Recent Comments