बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल उप कारागृहातून पळून गेलेल्या कैद्याला पकडण्यात बैलहोंगल पोलिसांना यश आले आहे.

होय, २० दिवसांपूर्वी तुरुंगातून पळून गेलेल्या खादीरसाब मदारसाब राजेखान या ३४ वर्षीय कैद्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. तो मूळचा सौंदत्ती तालुक्यातील स्त्तिगेरी गावचा रहिवाशी आहे. त्याला मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनी हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करून बैलहोंगल उप कारागृहात ठेवण्यात आले होते.
त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दंगल माजविणे यासह एकूण ६ गुन्हे नोंद आहेत. १६ मार्च रोजी खादीरसाब कारागृहातून बनावट चाव्यांचा वापर करून पळून गेला होता. त्याच्या पोलिसांनी पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी, उपनिरीक्षक प्रवीण गंगेळ व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.


Recent Comments