गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते कागवाड लगत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सीमेवरील निमशिरगाव या गावात तपस्यां आयुर्वेदिक चिकित्सा केंद्राचे उद्घाटन पार पडले.

निमशिरगाव गावातील कागवाड शिरगुप्पी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के पी मगेन्नवर यांचे पुतणे डॉ. अमूल पाटील यांनी निमशिरगाव या गावात तपस्यां आयुर्वेदिक चिकित्सा केंद्राची स्थापना केली आहे. या चिकित्सा केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांना उद्देशून डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात आयुर्वेदिक उपचार पद्धतीची देशाला नव्याने ओळख करून दिली आहे. मी स्वतः एक आयुर्वेदिक डॉक्टर असून २००८ पासून चिकित्सा पद्धती संपूर्णपणे रद्द केली आहे. यानंतर मी संपूर्णपणे राजकारणात कार्यरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन चालवत आहे. गोव्यात आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती प्रारंभ करण्यासाठी अनुकूल वातावरण असून गोव्यात देखील आयुर्वेदिक उपचार पद्धती सुरु करण्यासाठी आपले स्वागतच आहे असे आवाहन देखील डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदलगा मतदार संघाचे माजी आमदार के पी मगेन्नावर हे होते. यावेळी त्यांनी तपस्या आयुर्वेदिक केंद्राला शुभेच्छा देत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी येथील वैद्यांना दिलेल्या आवाहनाचे स्वागत केले.
यावेळी आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा केंद्राचे प्रमुख डॉ. अमूल पाटील यांनी आरोग्य केंद्राबद्दल माहिती दिली. या आरोग्य केंद्रात १८ डॉक्टर कार्यरत असणार आहेत. तसेच नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जाणार असून केरळ राज्यातील क्षार पद्धतीचा अवलंब याठिकाणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास आमदार समित कलाम, महेश संडिगे, जयसिंगपूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष संजय यड्रॉवकर आदींसह अनेक डॉक्टर उपस्थित होते.


Recent Comments