खानापूर तालुक्यातील नंदगड ग्राम पंचायत हद्दीतील प्रभाग क्र. ३ मध्ये विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला.

नंदगड ग्राम पंचायत हद्दीतील प्रभाग क्र. ३ मध्ये विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. या संदर्भात बोलताना प्रभाग क्र. ३ च्या सदस्या वैष्णवी पाटील म्हणाल्या, १५ व्या वित्त अयोग्य योजनेतून ४ लाख रुपये अनुदानातून २ सीडी वर्क आणि गटार बांधणी कामा प्रभागात चालना देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व विकासकामे करून प्रभागाची सुधारणा करण्यात येईल असे त्या म्हणाल्या. त्यानंतर बोलताना नीता देगावकर म्हणाल्या, आमच्या प्रभाग ३ मधील दुर्गा नगरमध्ये १ सीडी वर्क आणि २ गटारीचे काम हाती घेण्यात आले आहे. अधिकाधिक निधी मंजूर करवून घेऊन प्रभागात विकासकामे राबवण्यात येतील असे त्यांनी सांगितले. यावेळी संदीप संभाजी पारिशवाडकर, प्रदीप पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments