Belagavi

देवेंद्र आर. कराडे यांचे निधन

Share

 माहिती जनसंपर्क खात्याच्या बेळगाव उपसंचालक कार्यालयात वरिष्ठ वाहन चालक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावून निवृत्त झालेले देवेंद्र आर. कराडे यांचे आज निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.

त्यांच्या मागे पत्नी, २ मुलगे व १ मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या मृतदेहावर आज दुपारी सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. माहिती व जनसंपर्क खात्यात सुमारे ३० वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या देवेंद्र कराडे यांच्या निधनाबद्दल खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आणि कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Tags: