हुक्केरी तालुक्यातील विविध भागात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांचा शुभारंभ अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते करण्यात आला

हुक्केरी तालुक्यातील कागवाड, अम्मनगी, हुक्केरी आणि संकेश्वर नगर याठिकाणी पशु रुग्णालय, सीसी रस्ते कामकाज, गटारी, रस्त्यांचे डांबरीकरण, सी डी निर्माण यासह अनेक विकासकामे राबविण्यात येत आहेत. ६ कोटींच्या खर्चातून करण्यात येणाऱ्या या विकासकामांची सुरुवात अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते करण्यात आली. . यावेळी कंत्राटदार मल्लप्पा बिसिरोट्टी यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना उमेश कत्ती म्हणाले, हुक्केरी, संकेश्वर, अम्मनगी, यादगुड याठिकाणी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कामकाज सुरुवात करण्यात आले. आगामी काळात या भागाच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा पंचायत विभागाच्या वतीने सुमारे १५० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करून उर्वरित विकासकामे करून घेण्यात येणार आहेत.
यावेळी हुक्केरी नगरपालिकेचे अध्यक्ष ए के पाटील, सदस्य महावीर निलजगी, सिद्दू ह्लीजोळ, पिकार्ड संचालक परगौडा पाटील, बस्सू गंगणवर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंते गिरीश देसाई, इओ उमेश सिदनाळ, अभियंते प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.


Recent Comments