बेळगाव तालुक्यातील देसूर ग्राम पंचायतीच्या अध्यक्षांचा जातीवाचक अवमान केलेल्या सदस्य रामजी चव्हाण यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी कर्मचारी संघाच्या युवा शाखेने बुधवारी बेळगावात निदर्शने केली.

देसूर ग्रापंच्या अध्यक्षा लक्ष्मी पिरनवाडी यांच्या खुर्चीवर बसून, त्यांचा जातीवाचक अवमान रामजी चव्हाण यांनी केल्याचा आरोप निदर्शकांनी केला. भलतेसलते आरोप करून त्रास देत आहेत. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी कर्मचारी संघाच्या युवा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. फ्लो
यावेळी बोलताना राज्य युवा शाखेचे राज्याध्यक्ष महेश शिगीहळ्ळी म्हणाले, ग्रापं सदस्य रामजी चव्हाण हे देसूर ग्रापंमध्ये माझाच कारभार चालणार, न म्हणेल ते होणार असे सर्व सदस्यांसमोर सांगून अध्यक्षांचा अवमान करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अन्यथा आम्ही उपोषण करू असा इशारा दिला.
या निदर्शनात कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी कर्मचारी संघाच्या युवा शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी भाग घेतला.


Recent Comments