Belagavi

भिक्षुक महिलेवर बलात्कार करून खून करणाऱ्याला अटक

Share

बेळगावात सुमारे वर्षभरापूर्वी मानसिक अस्वस्थ भिक्षुक महिलेवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

होय, जून २०२१ मध्ये बेळगावातील मन नगरमध्ये एका मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असलेल्या भिक्षुक महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. आरोपीच्या शोधासाठी पोलीस कसून तपास करत होते. मात्र त्यांना यश येत नव्हते. अखेर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मूळच्या हुबळी येथील रफिक चौरंगवाले वय ४८ या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याची अधीक चौकशी माळमारुती पोलीस करत आहेत.

Tags: