Chikkodi

चिक्कोडीत स्टेशनरी दुकानाला आग; ५ झेरॉक्स मशिनींसह किंमती साहित्य खाक

Share

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत ऑनलाईन सेवा देणारे स्टेशनरी दुकान भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी रात्री चिक्कोडी शहरात घडली.

होय, चिक्कोडी शहरातील कृष्णा चौकाजवळील एसबीआय बॅंकेसमोरील अमित शिवानंद मुसंडी यांच्या मालकीच्या महाकोटेश्वरी स्टेशनरी दुकानाला मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात हे दुकान पूर्णतः भस्मसात झाले. शॉर्टसर्किटने लागलेल्या या आगीत दुकानातील ५ झेरॉक्स मशीन, १ लॅपटॉप, १ लॅमिनेशन मशीन एसी, कॅमेरा, टीव्हीसह अनेक किंमती साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

Tags: