आपण प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची पोचपावती मिळणे हि कौतुकास्पद बाब आहे, असा गौरव ऐनापूर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष कुमार अपराज यांचा होत असून हि अभिमानास्पद बाब असल्याचे मत विरुपाक्ष डुगनवर यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु झालेल्या ऐनापूर येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष कुमार अपराज यांनी शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी अनेक कामे केली आहेत. अनेक वर्षे त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रासाठी कार्य केले असून त्याच्या परतफेडीची अपेक्षा केली नाही. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन अखिल कर्नाटक गोवा कन्नड महासंघ आणि स्नेह युवा सांस्कृतिक संघ बेंगळुरू यांच्यावतीने कर्नाटक भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.(फ्लो)
या समारंभात बोलताना मुख्य कार्यकारी अन्नासाब डुगनवर म्हणाले, अनेकजण पुरस्कार, प्रसिद्धीसाठी सामाजिक कार्य करताना आढळतात. परंतु गेली अनेक वर्षे कुमार अपराज यांनी कोणत्याही परतफेडीची, प्रसिद्धीची अपेक्षा न करता आपले कार्य सुरूच ठेवले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना कर्नाटक भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे ते म्हणाले.
सत्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना कुमार अपराज म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या मित्रांच्या सहकार्याने संघटना बनून समाजाभिमुख कार्य आपण करत आलो आहोत. मला हा पुरस्कार देण्यात येईल, अशी मी अपेक्षाच केली नव्हती. कोणतेही कार्य करताना मी अपेक्षा ठेऊन कार्य केले नाही परंतु या पुरस्कारामुळे आपल्याला पुढील काळात सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळाली असल्याचे अपराज म्हणाले.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष सतीश गाणीगेर, संचालक भूपाल माणगावे, आदिनाथ दानोळ्ळी , अन्नासाब डुगनवर, प्रवीण कुलकर्णी, महावीर बेडर, बसवराज जिरगाळे, धरेप्पा अकिवाटे, महादेव पडियर, मृत्युंजय हिरेमठ, श्रीशैल दोड्डान्नावर, श्रीकांत यंडोळ्ळी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments