Vijayapura

कत्नळ्ळी सदाशिव मुत्यान यात्रोत्सवाला सुरुवात

Share

दरवर्षी प्रमाणे गुढीपाड्व्यादरम्यान होणारी विजापूर तालुक्यातील कत्नळ्ळी सदाशिव मुत्यान यात्रा सुरु झाली असून हि यात्रा पाच दिवस भरणार आहे. या यात्रोत्सवात विविध जाती धर्माच्या भक्तांचा सहभाग मोठ्या संख्येने दिसून येतो. गुढी पाडव्याच्या तिसरे दिवशी याठिकाणी शिवय्या स्वामींची भविष्यवाणी वर्तविली जाते. हि भविष्यवाणी ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी जमा होतात.

विजापूर तालुक्यातील कत्नळ्ळी सदाशिव चक्रवर्ती मठाची यात्रा गुढी पाडव्यादरम्यान आयोजित करण्यात येते. पाच दिवस हि यात्रा भव्य प्रमाणात साजरी करण्यात येते. विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून हि यात्रा भरविली जाते. याचप्रमाणे कृषी मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात येते. याचप्रमाणे यात्रोत्सवाच्या निमित्ताने बैलगाडी शर्यतीचे देखील आयोजन केले जाते. इतकेच नाही तर यात्रेच्या निमित्ताने मोफत सामूहिक विवाह समारंभ देखील आयोजित केला जातो. यंदाच्या यात्रोत्सवात जवळपास ४० जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. तसेच या यात्रेचे विशेष आकर्षण असणारी शिवय्या स्वामींची भविष्यवाणी ऐक्यासाठी देखील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

हिंदू नवीन वर्षानुसार नव्या संवत्सराची सुरुवात झाली आहे. या औचित्याने कत्नळ्ळी सदाशिव चक्रवर्ती मठाचे मठाधीश शिवय्या स्वामी यांनी भक्तांना उपदेश दिले आहेत. इतरांचे वाईट चिंतू नका भारतीय संस्कृती जपा, पैशांसाठी मत विकू नका, देशाची संस्कृती, आचार विचार अबाधित राखण्यासाठी मुली महत्वाच्या आहेत. यासाठी मुलींचे जतन हे सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे करा. जातीयवादी अजेंडा बाजूला सारा, नीतिमत्ता विसरू नका, प्रेमाने वागा, संस्कृतीचे जतन करा यासह अनेक गोष्टींबाबत स्वामींनी भाकीत केले.  उत्तर कर्नाटकात मठाची परंपरा मोठ्या प्रमाणात आहे. मठ संस्कृतीवर भक्तांची अपार श्रद्धा आहे. यासह या मठांमध्ये होणाऱ्या भविष्यवाणीवर देखील भक्तांचा विश्वास असून कत्नळ्ळी सदाशिव चक्रवर्ती मठात केल्या जाणाऱ्या भविष्यवाणीसाठी भक्तांची आतुरता वाढली आहे.

Tags: