Athani

अथणी येथे बाबू जगजीवनराम जयंती उत्साहात

Share

अथणी येथे डॉ. बाबू जगजीवनराम यांची ११५ वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.

अथणी तालुका प्रशासन, तालुका पंचायत, नगरपालिका आणि समाज कल्याण विभाग अथणी यांच्या सहयोगाने हरित क्रांतीचे प्रणेते, माजी उपपंतप्रधान डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या ११५ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. अथणी येथील डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली. सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

यावेळी सीपीआय शंकरगौडा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, लोकशाहीत समाजाला हेच हवे असते
जे देशाच्या हिताचे आहे, समाजाच्या भल्यासाठी आहे. याच तत्वानुसार बाबू जगजीवनराम यांनी कार्य केले. हरित क्रांती घडविली. डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या योगदानाबद्दल आजच्या पिढीला माहिती करून देणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी समाज कल्याण अधिकारी प्रवीण पाटील, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी शेखर करबसप्पगोळ, सीडीपीयु अशोक कांबळे, पीएसआय कुमार हाडकार, गौडाप्पा खोत, इराण्णा दड्डी, बसगौड कागे, पुनीत पासोडी तसेच अनेक अधिकारी उपस्थित होते.

Tags: