Belagavi

रामदुर्ग वेंकटेश्वर यात्रेत बिगरहिंदू व्यापारांवर बंदी घालण्याची मागणी

Share

हिंदू देवस्थानांच्या आवारात आणि यात्रांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना पूजासाहित्य विकण्यास बंदी घालण्याची मागणी आता बेळगाव जिल्ह्यांतही जोर धरू लागली आहे. रामदुर्ग येथील श्री वेंकटेश्वर यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याची मागणी आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केली आहे.

होय, हिंदू धार्मिक संस्थान आणि धर्मादाय दत्तक विधान अधिनियमानुसार धर्मादाय खात्याच्या कक्षेत येणाऱ्या रंदुर्गच्या श्री वेंकटेश्वर देवस्थानच्या यात्रेत बिगरहिंदूंना व्यापार करण्यास बंदी घालण्याच्या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने रामदुर्गच्या तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी बोलताना विश्व हिंदू परिषद तालुका सचिव रवी होसूर म्हणाले, येत्या ११ एप्रिलला रामदुर्गच्या ऐतिहासिक श्री वेंकटेश्वर देवस्थानची यात्रा भरणार आहे. या यात्रा महोत्सवात बिगरहिंदूना दुकाने थाटून व्यापार करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली. यावेळी चंबण्णा बैलवाड, संगमेष उदपुडी, चिदू तांबे, विजय महेंद्रकर, लक्ष्मण लाड,विठ्ठल गौरवर यांच्यासह विहिंप, बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: