पिरनवाडी येथे पंचकल्याण महामहोत्सवांतर्गत पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीमद देवादिदेव मूलनायक भ. श्री. १००८ नेमिनाथ तीर्थंकर तसेच मानस्तंभोपरी चतुर्मुख जिनबिम्ब पंचकल्याण महामहोत्सवांतर्गत पिरनवाडी येथे शनिवार दि. २ एप्रिल ते बुधवार दि. ६ एप्रिल असे पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
२ एप्रिल पासून सुरु झालेल्या या महोत्सवांतर्गत गर्भ कल्याण, जन्म कल्याण, दीक्षा कल्याण असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले असून मंगळवार दि. ५ एप्रिल रोजी केवलज्ञान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत नित्य विधी, इंद्र, इंद्राणी आगमन, मंत्रसंस्कार, केवलज्ञान, मंगल कुंभ आणण्यासाठी अभिषेक, शांती मंत्र, नामस्मरण असे विविध विधी आयोजित करण्यात आले होते. दुपारी आचार्य श्री यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. तसेच सायंकाळी दीपोत्सव, रथोत्सव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती.


Recent Comments