देवस्थानच्या सभामंडपांचा उपयोग सामाजिक धार्मिक कार्यक्रमांसाठी झाला पाहिजे. शिरगाव बसवेश्वर देवस्थानसह अन्य देवस्थानच्या विकासासाठी प्राधान्य देण्यात येत आहे असे वन मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले.

चिक्कोडी तालुक्यातील शिरगाव येथील श्री बसवेश्वर देवस्थानच्या कल्याण मंडपाचे उदघाटन मंत्री कत्ती यांच्याहस्ते झाले. त्यानंतर बोलताना मंत्री कत्ती म्हणाले, धार्मिक स्थळे सामाजिक विकासाला पूरक ठरली पाहिजेत. बसवेश्वर देवस्थानचा अजून विकास झाला पाहिजे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील एरव्ही नेत्यांनी त्यासाठी सहकार्य दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर बोलताना चिक्कोडी-सदलगा मतदार संघाचे आ. गणेश हुक्केरी म्हणाले, मतदार संघातील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मी माझे वडील माजी खा. प्रकाश हुक्केरी यांनी एकूण ५० लाख अनुदान मिळवून दिले आहोत. त्याशिवाय गावातील मारुती मंदिरालाही अनुदान मिळवून देना राहोत असे सांगितले. या प्रसंगी निडसोसी पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी, चिंचणी अल्लमप्रभू स्वामीजी यांचे आशीर्वचन झाले. या कार्यक्रमाला माजी खासदार रमेश कत्ती, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिरगावचे सदाशिव स्वामीजी, नरसिंगेश्वर महाराज, शिवबसव स्वामीजी, गौरवसिंह नरसिंहराव मुतालिक-देसाई, राजू कडोले, पृथ्वी कत्ती, एस. वाय. हंची आदी उपस्थित होते.


Recent Comments