Chikkodi

नाती निभावताना महिला कर्तव्य चोख पार पाडतात : शांभवी अश्वत्थपूर

Share

आई, पत्नी, बहीण, मुलगी अशी अनेक नाती निभावताना महिला आपली कर्तव्ये चोख पार पाडतात असे विचार चिक्कोडी जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा शांभवी अश्वत्थपूर यांनी मांडले.

चिक्कोडी तालुक्यातील शिरगुप्पी येथे डॉ. अमोल सरडे प्रतिष्ठानतर्फे आयोजित महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, महिला कुटुंबाचा आधारवड म्हणून काम करतात. आपली अनेक दुःखे विसरून कुटुंबासाठी त्या जगतात.

यावेळी अथणीच्या विश्व हिंदू परिषदेच्या वैभवी श्रीपाल कुलकर्णी यांनी प्रत्येक यशस्वी पुरुषकाच्या मागे एक महिला असते हे सत्य असल्याचे सांगितले.मंगसुळीचे नागलिंगेश्वर स्वामीजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांचे आशीर्वचन झाले.  यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. अमोल सरडे यांनी विचार मांडले.

यावेळी लक्ष्मी पाटील, शामला कांबळे, गंगुबाई कोळी, वर्ष पवार, श्वेता रोगे, हौसाक्का पाटील, भारती पट्टणकर, संगीता अमोल सरडे, विजया सरडे, शिरगुप्पी ग्रापं अध्यक्षा गीतांजली चौगले, नीता पुजारी, शिवानंद नावळील, कुमार दिवटे, सतीश दक्केरी, गिरीश पाटील, उदय देसाई, राजगौडा पाटील, उमेश सरडे, शांतीनाथ माणगावे, बाबासाब बोदरे, राहू हलदार, रोहित गुणके, विनायक जाधव आदी उपस्थित होते.

 

Tags: