Vijayapura

आ. पाटील-नडहळ्ळी यांच्यावर मौलानांची स्तुतीसुमने

Share

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळचे . . एस. पाटीलनडहळ्ळी यांच्याविषयी एका मौलवींनी गौरवोद्गार काढल्याचा व्हीडिओ विजापूर जिल्ह्यात व्हायरल होत आहे.  

पिलेकम्मा नगरातील नव्या शुद्ध पेयजल घटक आणि हायमास्टच्या उदघाटन समारंभात भाग घेतलेल्या आ. आ. ए. एस. पाटील-नडहळ्ळी यांच्याविषयी मौलाना खाजी यांनी गौरवोद्गार काढले होते. आ. पाटील-नडहळ्ळी सगळ्यांना समान वागणूक देतात, बंगळुरात माजी मंत्री आणि विध्यमान आमदार जमीर सम्द यांची आम्ही भेट घेतली असता, आ. पाटील-नडहळ्ळी यांच्याविषयी त्यांनीही चांगले उद्गार काढले होते. ते एक सक्रिय नेते आहेत, तुमच्या गावात त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. मला मंत्रिपद नको, पण माझ्या मतदारसंघातील विकासकामे मंजूर करा असा हट्ट ते सरकारकडे करतात, कामे मंजूर करून घेऊन पूर्ण करतात. आधीच्या आमदारांनी फारशी कामे केली नाहीत. पण पाटील-नडहळ्ळी आमदार झाल्यानंतर झोपडपट्टी भागाचाही त्यांनी चांगला विकास केला आहे अशी स्तुतीसुमने मौलाना खाजी यांनी उधळली आहेत. त्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.   बाईट

एका मौलानांनी आधीच्या काँग्रेस आमदारांनी काहीच विकासकामे केली नाहीत. परंतु आ. पाटील-नडहळ्ळी यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला आहे अशा अर्थाचे भाषण उर्दू आणि कानडीत केल्याचा हा व्हीडिओ मुद्देबिहाळ भागात चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

Tags: