Belagavi

बेळगावात पत्रकार भवनाच्या जागेचे गुढीपाडव्यानिमित्त पूजन 

Share

बेळगावात श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन पत्रकार भवनासाठी जागा निश्चित करून आज गुढीपाडव्यानिमित्त पूजा करण्यात आली.

होय, बेळगावातील विश्वेश्वरय्या नगरात खा. मंगल अंगडी यांच्या निवासस्थानाशेजारील पाटबंधारे खात्याच्या जागेत श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन पत्रकार भवनासाठी जागा निश्चित करून आज गुढीपाडव्यानिमित्त विशेष पूजा करण्यात आली. या जागेवर नियोजित पत्रकार भवनाचा फलक उभारून पूजा करण्यात आली.

या कार्यक्रमात जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच अनेक पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे म्हणाले, राज्यात सर्वात मोठा असलेल्या बेळगाव जिल्ह्यात पत्रकार भवन नाही. त्यामुळे बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांना विचारून आज ही जागा निश्चित करण्यात आली आहे. लवकरच येथे पत्रकार भवनची कोनशिला बसवून एका वर्षाच्या आत पत्रकार भवन बांधून पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे असे कुरुंदवाडे म्हणाले. 

यावेळी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, पत्रकारांसाठी स्वतंत्र भवन बांधण्याची श्रमिक पत्रकारांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. त्यामुळे आज त्यासाठी जागा निश्चित करून पूजा करण्यात आली आहे. येथे मोठी जागा उपलब्ध असल्याने पत्रकारांची सोय होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला स्टुडिओही निर्माण करता येणार आहे असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी खा. मंगल अंगडी, आ. अनिल बेनके,  जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, उपाध्यक्ष व इन न्यूजचे मुख्य संपादक राजशेखर पाटील यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

 

Tags: