छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बेळगाव नगरीत धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासचा सांगता समारंभ गांभीर्याने पार पडला. यानिमित्त शिवाजीनगर येथे मूक मिरवणूक काढण्यात आली.

होय, क्रूरकर्मा औरंगजेबाने सतत ४० दिवस दिलेल्या यमयातना हसतहसत सहन करून मृत्यूला कवटाळलेल्या जाज्वल्य हिंदू धर्माभिमानी संभाजी महाराजांनी अखेरपर्यंत हिंदू धर्म सोडण्यास नकार दिला. त्यांनी मृत्यू पत्करला पण धर्म परिवर्तन केले नाही. त्यांच्या या बलिदानाची आठवण तेवती ठेवण्यासाठी गुढीपाडव्याच्या आधी ४० दिवस बलिदान मास पाळण्यात येतो.
सीमाभागातील बेळगावमध्येही हा बलिदान पाळून शुक्रवारी त्याची सांगता करण्यात आली. शहरातील शिवाजीनगरात यानिमित्त शिवप्रेमींनी शुक्रवारी सायंकाळी मूक मशाल मिरवणूक काढली. परिसरातील सर्व गल्ल्यांत ही मिरवणूक काढण्यात आली. समर्पणाचा भाव आणि मनात शिव-शंभूंचा अखंड गजर करत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या मूक मिरवणुकीत भाग घेतला. शिवाजीनगरातील शिवाजी चौकात मिरवणूक आल्यानंतर मशालीच्या अग्निकुंड पेटविण्यात आले. त्यानंतर या मूक मिरवणुकीची सांगता करण्यात आली. फ्लो
या मिरवणुकीत शिव-शंभू प्रेमींनी मोठ्या संख्येने भाग घेतला.


Recent Comments