Vijayapura

कालव्यात बुडून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

Share

कालव्यातील पाण्यात पाय घसरून बुडाल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील चिम्मलगी पाटबंधारे कालव्यात घडली.

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील मेहबूबनगरशेजारील शिरोळजवळील चिम्मलगी उपसा जलसिंचन कालव्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांसोबत गेलेल्या ६ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. रिझवान अल्लाबक्ष तारापर असे या मुलाचे नाव असून तो मेहबूब नगर येथे रहात होता. शुक्रवारी सायंकाळी पाण्यात पाय घसरून पडल्याने प्रवाहाबरोबर वाहत जाऊन त्याचा बुडून मृत्यू झाला.

अग्निशामक दलाच्या जवानांनी काळ सायंकाळपासून प्रयत्न करूनही त्याचा मृतदेह सापडू शकला नाही. आज, शनिवारी सकाळी १०च्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगू लागला. स्थानिक नागरिकांनी हे पाहून अग्निशामक दलाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मुद्देबिहाळ पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

 

Tags: