Belagavi

उगार खुर्द येथे छत्रपती शंभुराजांना अभिवादन-ज्वाला यात्रेसह मूक मिरवणूक

Share

कागवाड तालुक्यातील उगार खुर्द परिसरातील मराठा समाजाने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मूकपदयात्रेच्या माध्यमातून आदरांजली वाहिली.

शुक्रवारी सायंकाळी उगार परिसरातील लक्ष्मी मंदिरापासून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शेकडो युवकांच्या उपस्थितीत मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मी मंदिरापासून सुरु झालेल्या पदयात्रेची सांगता डॉ. जोग चौकात येऊन झाली. यावेळी धर्मवीर ज्वालेसाह अनेक युवकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.

कागवाडचे तहसीलदार राजेश बुर्ली यांच्याहस्ते धर्मवीर जवळ प्रज्वलित करण्यात आली यानंतर धर्मवीर संभाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संभाजी महाराजांच्या समाधी स्थळापासून सुमारे ५०० किलोमीटर अंतराहून कागवाड मधील युवकांनी धर्मवीर ज्वाला आणली होती.

यावेळी उगार नगरपालिकेच्या माजी अध्यक्षा नंदिनी फराकट्टी यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून शंभू महाराजांसंदर्भातील इतिहास सांगितला. शंभू महाराजांसारख्या शूर राजांचे शत्रूंनी केलेले हाल आणि त्यांचा झालेला दाहक मृत्यू हा आजही प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा आहे. शंभू महाराजांच्या या त्यागाबद्दल युवक बलिदान मास पाळतात. त्यांच्या शौर्याचे, धैर्याचे स्मरण करण्यासाठी कागवाड मधील युवक . स्तुत्य उपक्रम राबवित असल्याचे त्या म्हणाल्या. ()

धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तहसीलदार राजेश बुरली यांनी सहभाग घेऊन अभिवादन केले. यावेळी उगार येथील मराठा समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ शिरसाठ, उपाध्यक्ष सुहास शिंदे, विजय थोरूचे, सुरेश देसाई, सुजय फराकट्टे, सचिन तुवार, अजय घोडके, राकेश पाटील अभय दूंडाळ्ळी, आकाश कामेरी, संजय चव्हाण, महिला विभागाच्या नंदिनी फराकट्टी, निर्मला डेरे, सुप्रिया शिंदे आदींसह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Tags: