Belagavi

रामकृष्ण मिशनतर्फे संस्कृत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

Share

बेळगावातील रामकृष्ण मिशन आश्रमाच्या शहर शाखेतर्फे एप्रिलपासून संस्कृत प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वामी विवेकानंद मार्ग, रिसालदार गल्ली येथील आश्रमात दर शुक्रवारी व शनिवारी दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत संस्कृत शिकवणी वर्ग चालणार आहेत. प्रशिक्षण वर्गाचा कालावधी ४ महिने आहे. प्रशिक्षणार्थी किमान दहावी पस असावा, तसेच त्यांना देवनागरी लिपीचे लिहिण्या-वाचण्याचे ज्ञान असावे. इच्छुकांनी ७ एप्रिलच्या आत सकाळी ११.३० ते दुपारी १.३० आणि ४.३० ते ६ या वेळेत आश्रमाच्या कार्यालयात नावनोंदणी करावी असे आश्रमाच्या सचिवांनी कळविले आहे.

Tags: