Belagavi

करडीगुद्दी नजीक झालेल्या खून प्रकरणी पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया मारामारीत झाला एकाचा खून तर ७ जण जखमी प्रकरणाशी संबंधित चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Share

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसन हाणामारीत होऊन या हाणामारीत एकाचा खून तर ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी करडीगुद्दी येथे घडली होती. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी दिली आहे.

करडीगुद्दी येथे झालेल्या खूनप्रकरणी पोलीस आयुक्तांनी माहिती देताना सांगितले कि, करडीगुद्दी गावातील भरमोजी अरबळ्ळी, दोड्डाप्पा अरबळ्ळी, बसवन्त करवीनकोप्प, मारिहाळ येथील लक्काप्पा बसाप्पा हळ्ळी अशा चौघांना खूनप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. क्षुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीचे पर्यवसन खुनात झाले असून या प्रकरणात बैलहोंगल तालुक्यातील सुंकुप्पी या गावातील मुदुकाप्पा अंगडी (वय २५) या युवकाचा खून झाला आहे.

बेळगावहून बैलहोंगलला जाणारे वाहन अडविण्यात आल्यानंतर दोन गटात वादावादी सुरु झाली. दोन्ही गटातील वाद विकोपाला जाऊन वादावादीचे पर्यवसन हाणामारीत झाले आणि यादरम्यान मुदुकाप्पा अंगडी या युवकाचा खून झाला आहे. तसेच ७ जण गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

Tags: