Belagavi

अतिक्रमण हटविण्यासाठी मजगाव रहिवाशांचे पालिका आयुक्तांना निवेदन

Share

मजगांव येथील जैन समाजाच्या जमिनीवर तसेच रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले असून सदर अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी मजगांव रहिवाशांनी बेळगाव मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

मजगांव येथील सर्व्हे क्रमांक २००/१६ याठिकाणी इमारत बांधण्यात आली असून सदर इमारतीचे अतिक्रमण जैन समुदायाच्या जागेवर बेकायदेशीर रित्या झाले आहे. याच परिसरात सरकारी रस्त्याचीही जागा आहे. इमारत बांधकामात अतिक्रमण झाल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. या इमारतीला नागरिकांनी विरोधही केला होता. परंतु इमारतीचे बांधकाम थांबविण्यात न येता तसेच सुरु ठेवण्यात आले असून हे बांधकाम तातडीने थांबवून न्याय द्यावा, अशी मागणी पालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना जैन समुदायाचे नेते म्हणाले, अतिक्रमण करण्यात आलेली जागा हि जैन समुदायाशी निगडित आहे. याच जागेच्या बाजूने सरकारी रस्ताही आहे. या दोन्ही जागांवर बेकायदेशीर रित्या अतिक्रमण करून इमारत बांधण्यात येत आहे. या इमारतीच्या बांधकामाला येथील नागरिकांनी विरोध केला आहे. परंतु हे काम थांबविण्यात आले नसून हे बांधकाम तातडीने थांबविण्यासाठी आज आपण पालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत, असे ते म्हणाले.

सदर निवेदन सुपूर्द करताना मजगांव येथील ग्रामस्थ तसेच जैन समाजाचे नेते उपस्थित होते.

Tags: