Banglore

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

Share

 केंद्रीय गृह तसेच सहकार खात्याचे मंत्री अमित शहा यांचे आज शुक्रवारी कर्नाटकाच्या दिवसांच्या दौऱ्यावर बेंगळुरता आगमन झाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

२ दिवसाच्या बेंगळूर दौऱ्यासाठी केंद्रीय गृह तसेच सहकार खात्याचे मंत्री अमित शहा यांचे आज बंगळुरात आगमन झाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांचे विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमण्णा, महसूल मंत्री आर. अशोक, जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, परिवहनमंत्री बी. श्रीरामुलू, उच्च शिक्षणमंत्री अश्वथ नारायण, कृषिमंत्री बी. सी. पाटील, अबकारी मंत्री के. गोपाळय्या, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, पर्यटन मंत्री आनंदसिंग आदी उपस्थित होते.

 

Tags: