हुक्केरी तालुक्यातील कन्नड जानपद सदस्या तसेच सरकारी प्राथमिक शाळेच्या गुरुमाता लीला रजपूत यांना केंद्रीय साहित्य अकादमीच्यावतीने उपाध्यक्षपद तसेच सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर हुक्केरी कन्नड जानपद परिषदेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

व्हॉइस : कजाप तालुका अध्यक्ष सुभाष नायक यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले, परिषदेच्या सदस्या लीला रजपूत या नेहमीच परिषदेच्या कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतात. अनेक कार्यक्रम त्यांनी यशस्वी केले असून कन्नड जानपद परिषदेच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यानिमित्ताने लीला राजपूत यांचा सत्कार कजाप तर्फे करण्यात आला असून सत्कार स्वीकारल्यानंतर लीला रजपूत यांनी कन्नड जानपद परिषदेचे आभार मानले.
यावेळी कजाप सदस्य शिवानंद झुरली, कुमार बडिगेर, सुभाष बस्तवाड, अरुंधती शिरंगे, कावेरी पाटील, हालप्पा गावडी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments