राज्य भाजप सरकारने हलाल आणि टिपू सुलतान पाठ अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहेत. याचा निषेध करत एसडीपीआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि आरएसएस विरोधात आंदोलन छेदत निदर्शने केली. मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन देखील करण्यात आले.

हलाल आणि टिपू सुलतान अभ्यासक्रम पाठपुस्तकातून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ आज बेळगावमध्ये सदर आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनात भाजप सरकारचा निषेध व्यक्त करत धरणे आंदोलन छेडण्यात आले.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना एसडीपीआय कार्यकर्ते म्हणाले, राज्यात भाजप सरकारने हलाल कट तसेच टिपू सुलतान इतिहास अभ्यासक्रमातून वगळला आहे. हलाल परंपरेमागे वैज्ञानिक कारण असून यासंदर्भात सरकारने विचार करणे आवश्यक आहे. यासंदर्भात सरकार केवळ एका समाजाला लक्ष्य करत असून आपण सरकारच्या या धोरणाचा निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला. कोविड नंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. रोजगार पुरविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. शिवाय सरकारचे विकासकामांकडेही लक्ष नाही. या सर्व गोष्टींपासून लक्ष विचलित करण्यासाठी एकाच समाजाला लक्ष्य करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी एसडीपीआय संघटनेचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.


Recent Comments