महिलांसह सगळ्यांना समानतेची वागणूक देणे हाच खरा धर्म आहे असे विचार खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी मांडले.

खानापूर तालुक्यातील हत्तरवाड येथे नूतन श्री रामलिंग देवस्थानचे उदघाटन आ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते झाले. यावेळी त्यांनी रामलिंगाचे दर्शन घेतले.
त्यानंतर झालेल्या जाहीर समारंभात बोलताना आ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, मंदिरांमुळे संस्कृतीचे पालन होते. धर्म, संस्कृती आणि नैतिकता मंदिरांमुळेच टिकवली जाते. यावेळी त्यांनी गेल्या ४.५ वर्षांत आमदार म्हणून तालुक्यात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. यावेळी मंदिर उभारणीसाठी सहकार्य केलेल्या दानशूरांचा आणि मंदिर समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मंदिर समितीतर्फे आ. अंजली निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि हत्तरवाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments