बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने केएसआरटीसी बस उलटल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील बस्सापूर येथे गुरुवारी घडली. सुदैवानेच या घटनेत मोठी जीवहानी टळली.

होय, बेळगावहून पाच्छापूरला जाणारी कर्नाटक परिवहन मंडळाची बस आज सकाळी बस्सापूरजवळ रस्त्याकडेला उलटली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. सुदैवानेच या अपघातात मोठी प्राणहानी टळली. केवळ ४ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारांसाठी बेळगावच्या बीम्स जिल्हा इस्पितळात पाठवून देण्यात आले. पाच्छापूर दूरक्षेत्राचे एएसआय मुरगोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments