Belagavi

बेळगावात बुडा अभियंत्याला शेतकऱ्यांचा घेराव

Share

 न्यायालयाचाजैसे थेआदेश असूनही काम सुरु करण्यास गेलेल्या बुडा अभियंता एस. . नायक यांना शेतकऱ्यांनी घेराव घालून जाब विचारल्याचे घटना बेळगावात घडली

होय, बेळगाव नगरविकास प्राधिकरणाच्या अभियंत्याला शेतकऱ्यांनी घेराव घालून जाब विचारल्याचे घटना बेळगावात आज कणबर्गीजवळ घडली. नगरविकास प्राधिकरणाकडून नवीन गृहनिर्माण वसाहत उभारण्यासाठी शेतकऱ्यांकडून 25 एकर जमीन संपादित करण्यात येणार होती. त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने शेतकऱ्यांचा अर्ज दाखल करून घेत या प्रकरणी ‘जैसे थे’चा आदेश बजावला आहे. तरीही या आदेशाचे उल्लंघन करून बुडा अभियंता एस. इ. नायक हे अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसह त्या जागेत गेले होते. त्यावेळी बबन मालाई यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांना घेरावाघळून जोरदार घोषणाबाजी केली

 

 

Tags: