प्रतिष्ठेपायी लग्न समारंभात हवेत गोळीबार करणे एकाला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी चालवली आहे. ही घटना हुक्केरी तालुक्यातील एलीमुन्नोळी गावात घडली.

होय, लग्न व अन्य समारंभात खोट्या प्रतिष्ठेपायी हवेत गोळीबार केल्याच्या बातम्या आपण ऐकतो वाचतो. अशीच एक घटना हुक्केरी तालुक्यातील एलीमुन्नोळी गावात घडली. पण हा गोळीबार करणाऱ्याला ही चूक अंगलट आली आहे. एलीमुन्नोळी गावातील अयाज मलिक तहशीलदार यांच्या घरी लग्न समारंभ होता. यावेळी त्यांचा नातेवाईक रफिकसाहेब बुडनसाहेब तहशीलदार याने आपल्याकडील रिव्हॉल्व्हर काढून हवेत ५ राऊंड फायर केले. या घटनेची माहिती मिळताच हुक्केरी पोलीस ठाण्याचे सीपीआय मोहम्मद रफिक तहशीलदार यांनी रफिकसाहेब बुडनसाहेब तहशीलदार याच्यावर स्वयंप्रेरित गुन्हा दाखल केला आहे.
माणसाचा जीव जाऊ शकेल, जीवाला अपाय होऊ शकेल अशारितीने लायसन्स असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून हवेत ५ राऊंड गोळीबार करून कायध्यावें उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या आरोपाखाली हुक्केरीचे पीएसआय सिद्रामप्पा उन्नद यांनी रफिकसाहेब बुडनसाहेब तहशीलदार याला कलम 336 आणि सहकलम 30 अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. हल्ली वाढदिवशी तलवारीने केक कापणे, लग्न समारंभात हवेत गोळीबार करणे आदी गोष्टी सामान्य होत चालल्या आहेत. यावर सरकारने नियंत्रण आणण्याची गरज आहे.


Recent Comments