Vijayapura

गुढी पाडव्यानिमित्त विजापूरमधील कत्नळ्ळी सदाशिव अज्जाची भविष्यवाणी

Share

उत्तर कर्नाटकातील जनतेचा मठ संस्कृतीवर मोठा विश्वास आहे. या मठांमध्ये करण्यात येणारी भविष्यवाणी कधीही खोटी ठरत नाही असा भाविकांचा विश्वास आहे. विजापूरमधील प्रसिद्ध बबलादी मठाच्या भविष्यवाणीसह कत्नळ्ळी मठाच्या सदाशिव आज्जांची भविष्यवाणी देखील तंतोतंत खरी ठरते असा सामान्य भाविकांसह राजकारण्यांचाही विश्वास आहे. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी विजयकुमार सारवाड यांनी घेतलेला आढावा पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून ……

उत्तर कर्नाटकातील मठ परंपरेला विशेष महत्व आहे. विजापूरमधील बबलादी मठात शिवरात्रीनिमित्त होणाऱ्या यात्रोत्सवात भविष्यवाणी करण्यात येते. याचप्रमाणे गुढी पाडव्यानिमित्त विजापूर मधील कत्नळ्ळी येथील मठात देखील सदाशिव आज्जांची भविष्यवाणी करण्यात येते. या भविष्यवाणीवर सर्वसामान्य भाविकांसह अनेक राजकारणी देखील विश्वास ठेवतात. इतकेच नाही तर हि भविष्यवाणी आजवर कधीही खोटी ठरली नसल्याचे भाविक सांगतात. केवळ उत्तर कर्नाटकाचा नाही विजापूरसह बागलकोट, बेळगाव, कलबुर्गी यासह अनेक राज्यांमधील भाविक याठिकाणी भविष्यवाणी ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होतात. गुढी पाडव्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या यात्रोत्सवात हि भविष्यवाणी केली जाते. या भविष्यवाणीची भाविक मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. या यंत्ररोत्सवाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री सदाशिव मठाचे मठाधीश श्री शिवय्या स्वामीजी यांनी केले आहे.

श्री गुरुचक्रवर्ती सदाशिव यात्रा महोत्सवाच्या औचित्याने कत्नळ्ळी येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. १ एप्रिल ते ५ एप्रिल पर्यंत हि यात्रा आयोजित करण्यात आली असून या यात्रोत्सवात रुद्राभिषेक, कंभाभिषेक, प्रश्नमंजुषा स्पर्धा, सामूहिक विवाह, कुस्ती यासारखे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच शिव चिदंबरेश्वर मठाचे पिठाध्यक्ष दिवाकर शंकर दीक्षित गुरुमहाचार्य या यात्रोत्सवात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनी दिली आहे.

विजापूरमधील बबलादी मठासह कत्नळ्ळी मठातील भविष्यवाणीसाठीही भाविक आतुर झाले असून येत्या गुढी पाडव्यानिमित्त होणाऱ्या या यात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: