Belagavi

आम आदमी पक्षातर्फे राजकुमार टोपण्णावर यांनी घेतली पत्रकार परिषद

Share

: ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत निविदा मंजूर करण्यासाठी ४ कोटी रुपयांच्या देयकावर ४० टक्क्यांचे कमिशन मागणाऱ्या के एस ईश्वरप्पा यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे उत्तर विभागाचे प्रभारी राजकुमार टोपण्णावर यांनी केली आहे.

व्हॉइस : मंगळवारी बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हुबळी येथील कंत्राटदार पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्याकडून ४० टक्क्यांचे कमिशन मागितल्याचे सांगत आहे. यासंदर्भात पंतप्रधानांना त्यांनी पत्र लिहिले असून हे प्रकरण निवळण्यापूर्वी बेळगावच्या संतोष पाटील या कंत्राटदारानानेही आपल्याकडून कमिशन मागितल्याचा आरोप करत पंतप्रधान कार्यालयात तक्रार केल्याचे समोर आले आहे. हे सारे प्रकरण लक्षात घेता मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राजकुमार टोपण्णावर यांनी केली आहे.

भाजप सरकारमध्ये सर्व विभागात भ्रष्टाचार सुरू आहे. कोणत्या कारणास्तव मंत्र्यांनी कमिशन मागितले आणि कोणत्या आधारावर निविदा मंजूर केली असा प्रश्नदेखील राजकुमार टोपणनवर यांनी उपस्थित केलाय. या साऱ्या प्रकारचा जोवर उलगडा होत नाही तोवर मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी टोपण्णावर यांनी केली. बेळगाव स्मार्ट सिटी कामकाजांतर्गत होत असलेल्या कामकाजात कोणतेही तथ्य नाही. या कामकाजाची कोणतीही तपासणी होत नाही. याविरोधात आम आदमी पक्ष आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही टोपण्णावर यांनी दिला. ()

यानंतर एपीएमसी संदर्भात बोलताना ते म्हणाले, भाजप आमदारांनी खाजगी एपीएमसी निर्माण करण्यासाठी सहकार्य देऊन सरकारी एपीएमसी व्यावसायिकांना संकटात टाकले आहे. खाजगी एपीएमसीमुळे सरकारी एपीएमसीमधील व्यापाऱ्यांवर अन्याय झाला आहे. भाजप आमदारांच्या संगनमताने उभारण्यात आलेल्या खाजगी एपीएमसीची पडताळणी व्हावी, आणि संबंधितांवर कारवाई करावी असा आग्रह देखील राजकुमार टोपण्णावर यांनी केली.

या पत्रकार परिषदेला आम आदमी पक्षाचे नेते शंकर हेगडे, अनिस सौदागर यासह अनेक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Tags: