Belagavi

बेळगावमध्ये विविध कामगार संघटनांची निदर्शने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निषेध रॅली कामगार विरोधी धोरणांचा निषेध

Share

आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेचा आग्रह करत सीआयटीयू नेतृत्वाखाली बँक कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि इतर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी बेळगावमध्ये आंदोलन छेडले.

बेळगाव शहरातील एआयटीयूसी संघटनेच्या नेतृत्वाखाली केंद्राच्या नूतन कामगार धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले. केंद्र सरकारने जारी केलेले कामगारविरोधी धोरण मागे घेण्यात यावे, खाजगीकरण थांबवावे, दरवाढ नियंत्रणात आणावी, सर्व कामगारांना किमान वेतन जारी करावे, तसेच पेन्शन योजना जारी करण्यात यावी यासह अनेक मागण्यांच्या आग्रहास्तव आज आंदोलन सीआयटीयू नेतृत्वाखाली बँक कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि इतर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी बेळगावमध्ये आंदोलन छेडण्यात आले होते. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे सर्व आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली.

यासंदर्भात आपली मराठीला प्रतिक्रिया देताना एआयटीयूसीचे राजू म्हणाले, केंद्र सरकाने जारी केलेले नूतन कृषी कायदे, कामगार कायदे, आशा कार्यकर्त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, मासिक १८ हजार रुपये वेतन द्यावे, दरवाढ नियंत्रणात आणावी या सर्व मागण्यांसाठी आज आपण आंदोलन छेडले आहे. केंद्र सरकारने जारी केलेले कामगार कायदेही मागे घ्यावे असा आग्रह आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. ()

याचवेळी आणखी एका आंदोलकाने सांगितले कि, केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ आज सर्व कामगारांनी आंदोलन छेडले आहे. हे आंदोलन देशव्यापी सुरु असून सरकारने सुरु केलेल्या खाजगीकरणाविरोधात देखील आपण लढा देत असल्याचे ते म्हणाले. ()

जी एम जैनेखान यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, कि गेल्या दोन दिवसांपासून सरकारच्या धोरणाविरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनात विविध विभागाचे सरकारी कर्मचारी यासह अनेकांनी सहभाग घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेली धोरणे मागे घ्यावीत, गरीब कामगारांना सेवा सुरक्षा द्यावी, खाजगीकरण थांबवावे या मागणीसाठी आपण बेळगावमध्ये आंदोलन करत असल्याचे ते म्हणाले.

याचप्रमाणे गीता रायगौड या म्हणाल्या, सरकार आशा कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहे. सरकारसाठी आपण आजवर अनेक कामे केली आहेत. परंतु सरकार आपल्यावर अन्याय करत आहे. कोविड काळात सर्व आशा कार्यकर्त्यांनी पुष्कळ काम केले आहे. परंतु आमच्या मानधनात सरकारने अर्थसंकल्पात यंदा केवळ १००० रुपयांची वाढ केली असून सरकारच्या या धोरणाविरोधात आपण पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील सर्व कर्मचाऱ्यांसहित आज एआयटीयूसी च्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात आले होते. देशभरात गेल्या दोन दिवसांपासून विविध विभागातील कामगारांनी आंदोलन छेडले असून कामगारांच्या मागण्यांना सरकार कसा प्रतिसाद देते हे आता पाहावे लागेल.

Tags: